Tuesday, 14 April 2015

कंगणाचा डबल अंदाज 'तनु वेड्स मनु रिटर्न' चा ट्रेलर आऊट

'तनु वेड्स मनु 'च्या यशानंतर आता बहुचर्चित सिनेमा तनु वेड्स मनु रिटर्न याचा ट्रेलर नुकताच रिलिज झालाय. प्रोेमो मध्ये तनु म्हणजेच कंगना राणावतचे दुहेरी अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हा सिनेमा येत्या 22 मे ला आपल्या भेटीस येतोय.

Wednesday, 18 March 2015

अपघातात घडलेल्या प्रेमाचा 'अगं बाई अरेच्चा 2'

खुप दिवसापांसुन चर्चित असलेला केदार शिंदे यांचा 'अगं बाई अरेच्छा 2' याची उत्सुकता आता लवकरच संपणार आहे. सोनाली कुलकर्णी ची मुख्य भुमिका असलेल्या या सिनेमात भरत जाधव आणि प्रसाद ओक ची देखील महत्वपुर्ण भुमिका आहे.  नुकताच  या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला असुुन 22 मे ला आपल्या भेटीस येणार आहे.

Saturday, 14 March 2015

अपुऱे राहिलेल्या प्रेमाची नव्याने सुरुवात लवकरच.....

टाईमपास 2 चा ट्रेलर आऊट.........

'टु बी कंटिन्यु' म्हणत ज्या 'टाईमपास' चित्रपटाने प्रेक्षकाच्या मनात दगडु- प्राजक्ता च्या अपुर्ण राहिलेल्या प्रेमाबद्दल  हुरहुर निर्माण केली होती,, त्यालाच पुर्ण कऱण्यासाठी म्हणजेच प्राजु आणि दगडु च्या प्रेमाचा गोड शेवट करण्य़ासाठी टाईमपास दिग्दर्शक रवी जाधव आता लवकरच टाईमपास 2  1 मे ला आपल्या भेटीला  आणत आहे. त्याचबरोबर आपले मोठे नवे प्राजु-दगडु कोण असणार यावरुनही  पडदा उठला असुन प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट हे आपल्याला त्य़ांची जागा घेताना दिसणार आहेत. आता, प्रेक्षकांनी जेवढे प्रेम छोट्या लव्हबर्ड्सला दिले आहे तेवढेच या नव्या जोडीला मिळेल का ? हे पाहण्यात मजा येईल ते 1 मे लाच............


Tuesday, 24 February 2015

बदलापुर: वरुण चा थरारक अंदाज


दिग्दर्शक : श्रीराम राघवन
निर्माता : दिनेश विजन, सिनील लुल्ला
कलाकार : वरुण धवन, यामी गौतमी, हिमा कुरेशी, नवाजुद्दीन सिद्धिकी

'डोट मिस द बिगिनिंग'  ही खेचक टॅगलाईन प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यासाठी पुरेशी असताना त्यात चाॅकलेट बॉय वरुणची थरारक सिरिअस टाईप भुमिका चित्रपटाला अजुन रंगवुन देते.  एक हसिना थी.जॉनी गद्दा सारखे चित्रपट केल्यानंतर आता दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी पहिल्यांदा असा थ्रिलर चित्रपट काढलाय. साधारण पणे चित्रपटाच्या नाव आणि प्रोमोवरुण या मध्ये बदला प्रकरण आहे याचा प्रत्यय येतोच.
         रघु (वरुण धवन) आणि त्याची पत्नि निशा ( यामी गौतम) त्यांचा मुलगा हे तिघांचे मिळुन सुखी कुटुंब असते. एका बॅंकेमध्ये दरोडा घातलेल्या चोरांकडुन निशा आणि तिच्या मुलाचा खुन होतो. आपल्या कुटुंबाला आपल्या डोळ्यासमोर डोळे बंद करताना पाहुन रघु मारेकऱ्यांचा शोध घेतो. दरम्यान पोलिस लायक (नवाजुद्दीन सिद्धिकी) ला  पोलिस पकडतात. जेव्हा लायक जेलमधुन सुटतो तेव्हा तो त्याचा शोध घेतो.  तर तो त्यासाठी काय प्रयत्न करतो, तो बदला घेण्यात यशस्वी होतो का ? त्याला त्य़ा दरम्यान कोणकोणत्या आव्हानांना सोमोरे जावे लागते हेच सगळे या सिनेमामध्ये दिग्दर्शकाने मांडले आहे.
      वरुण ने त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासुन लव्हरबाॅय, रोमांटिक भुमिका केल्या आहेत त्याचा सिरिअस, इंटेंस अभिनय त्याने पुरेपुर निभावलाय. लव्हरबाॅय सोबतच अनेक प्रकारच्या भुमिका करण्यात तो सक्षम आहे हे त्याने सिद्द केलेय. त्याचबरोबर, नवाजुद्दीन ने देखील खलनायकाची भुमिका साॅलेड केलीय. तर, हुमा कुरेशी हिने वैश्या ची भुमिका कॅरक्टरला सुट होईल अशी केली आहे. मराठी मधील अभिनेत्री राधिका आपटे हिची ही छोटी भुमिका चांगली होती.
    चित्रपटातील संगीत जी करदा, जीना जीना गाणे हे आजही तेवढेच हिट चालु आहे.सिनेमा ला सचिन जीगर यांनी संगीत दिले आहे.
     थोडक्यात, तुम्हाला जर वरुण चा हा नवा थरारक, अग्रेसिव साईड पाहायची असेल तर सिनेमा जरुर पाहा.

   






Monday, 16 February 2015

प्रेमा ची परिभाषा म्हणजे 'मितवा'


दिग्दर्शिका : स्वप्ना वाघमारे जोशी
निर्माता :  मिनाक्षी सागर, अम़ृत सागर,आकाश चोप्रा, शेखर ज्योती.
कलाकार : स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे.

मितवा - मित्र तत्वज्ञ वा़टाड्या स्वप्नील जोशीच्या या मितवा मधील शब्दांनी अख्या महाराष्ट्रातील तरुणाईला वेडावुन सोडले होते ,तो 'मितवा' नुकताच प्रदर्शित झालाय. मुळात प्रेम हा सर्व चित्रपटांमध्ये कॉमन शब्द असतो पण,कथेेत त्याची मांडणी दिग्दर्शक कशा प्रकारे करतो हि त्यांची परिक्षा असते आणि त्यात दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांनी स्वत ला चांगलेच सिद्द केलंय. चित्रपटाचे प्रोेमोज पाहताना याचा प्रत्यय येतोच की, यात प्रेमाचा त्रिकोण आहे, हे साहजिक आपल्याला प्रत्येक चित्रपटांमध्ये पाहायला मिळते पण, यामध्ये ही काहीसे वेगळेपण आहे , प्रेमात असतानाचा आनंद, कालांतराने ते दुरावल्याने होणारे दुख, ड्रामा,ट्रेजडी,रुसवा या सर्वांचे मिश्रण करुन बनवण्यात आलेला हा करण जोहर टाईप सिनेमा प्रत्येकाला काहीना काही प्रेमाचे धडे देऊन जाणारा आहे एवढे मात्र नक्की..आपण ज्यांच्यांवर प्रेम करतो तो सतत आपल्याजवळ असण्यापेक्षा त्याचा काही काळापुरता सहवास हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, असेच काहीसे सांगण्याचा प्रयत्न स्वप्ना वाघमारे यांनी सांगितलाय. त्याचे प्रेम जरी आपल्या सोबत नसेल तर त्याची बांधिलकी आपल्याकडे असते.

  तिचं कर्तव्य तिथे असले ना... तरी तिचं प्रेम इथे आहे.
  तिची बांधिलकी तिथे असली....तरी तिचामितवा इथे आहे

     
हिंदी सृष्टीतील छोट्या पडद्यावर यशस्वी काम करणारी दिग्दर्शिका स्वप्ना जोशी वाघमारे यांनी पहिल्यांदाच मितवा या रोमांटिक चित्रपटातुन मराठी सिनेस़ृष्टीत दिग्दर्शिका म्हणुन पाऊल टाकले आहे. तरुणाईचा इंट्रेस लक्षात घेऊन आजच्या पिढीला काय आवडेल, आणि त्याचबरोबर प्रेमातुन ही काहीसे धडे मिळतील याचा एकत्रित विचार करुन सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 
      (स्वप्निल जोशी )शिवम सारंग दिलफेक, अय्याश पण एका आलिशान रेसोर्ट चा मालक ज्याला प्रेम, लग्न, कमेटमेंट या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. तर दुसरीकडे अवनी (प्रार्थना बेहरे)  त्याची सहकारी आणि मैत्रीण ही.. ज्यांचे नाते हे मैत्रीच्या थोडे पलिकडे तर प्रेंमाच्या थोडे अलिकडचे. अवनी जिचे शिवम वर प्रेम असते. आता या दोघांच्या मैत्रीमध्ये एन्ट्री होते ती नंदनी ची (सोनाली कुलकर्णी) ची जी शिवम च्या ऑफिस मध्ये नोकरीकरिता  आली असते अत्यंत साधी, सरळ.. सोनाली चे शिवम कडे डुंकुन ही न पाहणे,त्याला अस्वस्थ करते नकळत तो ति्च्याकडे् ओढला जातो तिच्यावर प्रेम करु लागतो शेवटी त्याच्या ही प्रेमाची छाप साेनाली वर पडतेच पण, एक गोष्ट असते जी तिला त्याच्याकडे जाण्यास मज्जाव करत असते आणि त्याचा उलगडा होतो तो फ्लॅशबॅक मध्ये,.....भुतकाळातील घटनेमुळे तिचे पाय शिवम कडे सरसावत नसतात...आणि ते नक्की काय आहे हाच आहे 'मितवा' चा सस्पेन्स...
      स्वप्निल जोशी ने शिवम हा कॅरेक्टर चांगलाच जमावलाय. त्याच्या या प्लेबॉय ईमेज त्याची फिमेल फॉलोविंग मध्ये अजुन वाढ होईल हे मात्र नक्की.  तर,  लक्स झक्कास हिरोईम मधुन विजेती बनलेली अभिनेत्री प्रार्थना बहिरे ने ही स्वत ला चांगलेच सिद्ध केलंय.. क्लासमेट्स नंतर अत्यंत वेगळ्या रुपात येऊन आपली साधी छाप पाडण्यात सोनाली कुलकर्णी ही यशस्वी ठरली. तर, संग्राम साळवी, इला भाटे, करुणा ईराणी यांच्य़ा छोट्या भुमिका ही अप्रतिम होत्या.
       त्याचबरोबर चित्रपटातील गाण्यांकरिता निवडण्यात आलेले लोकेशन्स देखील अप्रतिम आणि त्यामुळे  गाणी पाहण्यास आतुरता वाटते. त्याला सुरेख जोड मिळाली ती, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार शंकर, एहसान, लॉय, आणि निलेश मोहरीर, अमित राज,पंकज पाडघाण, यांच्या संगीताच्या स्पर्शाने चित्रपटाच्या गाण्यांना चाॅंद चाॅंद लावलं. मोजुन फक्त 5 गाणी असलेल्या या चित्रपटात गाण्यांची माडंणी कुठे आणि कशी करायची याची चांगलीच दखल दिग्दर्शक ने घेतली आहे. सावर रे, मितवा, सत्यम शिवम सुंदरम, हे गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठांवर नाचत आहे.
थोडक्यात काय तर, प्रेमाच्या दिवसात आपल्या जोडीदारासोबत अर्थात आपल्या मितवा सोबत प्रेमाची परिभाषा जाणुन घ्यायला मितवा पाहायलाच हवा
   
      

Sunday, 8 February 2015

चेहरा आणि आवाज यांचा अचुक मेळ म्हणजे 'शमिताभ'


दिग्दर्शन : आर. बाल्की
निर्माता : सुनिल लुल्ला, आर. बाल्की,राकेश झुंझुनवाला.
कलाकार : अमिताभ बच्चन, धनुष, अक्षरा हसन


अगळा वेगळा अंदाज आणि हटके भुमिका करण्याचा अमिताभ बच्चन चा फॉमुला  नेहमीच काम करतो. चिनी कम आणि पा सारखे हटके सिनेमा दिणारे दिग्दर्शक आर. बाल्की हे पुन्हा नवीन थिम घेऊन आपल्या समोर आलेत.

दानिश (धनुष) ज्याला अभिनय आणि चित्रपटांचा फार क्रेझ असतो, त्याची हिच आवड त्याला मुंबईला घेऊन येते. तेथे त्याची ओळख होते असिस्टंट डायरेक्टर अक्षरा सोबत. आणि मग, तिच्या सहाय्याने दानिश आपले स्वप्न पुर्ण करु पाहतो. तर दुसरीकडे अमिताभ सिन्हा (अमिताभ बच्चन) ज्यांना एक्टर बनायचे असते,,रोजचा स्ट्रगल आणि संघर्ष त्यांना दारुच्या आहारी घेऊन जातो. दानिष हा मुका असल्याने त्याला कुठेही काम मिळत नसते मग तेव्हा अमिताभ चा आवाज आणि दानिष चा बेतोड अभिनय म्हणजे 'शमिताभ' चा झक्कास केमेस्ट्री येथे प्रेक्षकांना पहायला मिळणार.

           चिनी कम, पा सारखे चित्रपट केल्यानंतर नवीन प्रयोग आर. बाल्की  यांनी केलाय.आवाज एकाचा आणि अभिनय एकाचा याची एकत्र ट्युनिंग अगदी अचुकपणे मिळवुन आणणे सोपे नाही पण त्यांनी हे चांगलेच जमवुण आणले आहे.
      अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन यांनीस्टगलिंग एक्टर आणि दारुडा व्यक्तिचा अभिनय मस्तच केलाय  त्याचबरोबर  त्याला तडका मिळालाय तो त्यांचा विनोदी पणाचा. आणि अमिताभ यांच्या आवाजाचा पिदली सी बाते हे त्यांच्या आवाजातले गाणे सध्या चर्चित झालेय.  म्हणजे सोने पे सुहागा. तर, धनुष ने देखील त्याच्या अभिनयाला पुरता न्याय दिलाय. अक्षरा हसन चा पहिलाच सिमेमा असुन तिच्या वाटेला आलेला रोल तिने चांगलाच सांभाळलाय.

थोडक्यात, वेगळी आणि मनोरंजनात्मक कथा आणि अमिताभ बच्चन आणि धनुष चा उत्कृष्ट अभिनय, केमेस्ट्री तुमचे मनोरंजन करेलच.


Wednesday, 4 February 2015

  प्रत्येकामध्ये दडलेला 'मितवा' लवकरच आपल्या भेटीला....
'मितवा ' - मित्र तत्वज्ञ वाटाड्या 

Saturday, 24 January 2015

डोकं उठवणारी 'डॉली की डोली'


दिग्दर्शक : अभिषेक डोगरा
निर्माता : अरबाज खान
संगीत : साजिद वाजिद,
कलाकार : सोनम कपुर, राजकुमार राव, पुलकित सम्राट, वरुण शर्मा


अभिषेक डोगरा दिग्दर्शित डॉली की डोली हा सिनेमा एक अशा कथेवर आधारित आहे ज्यात डॉली (सोनम कपुर) पैशासाठी लुटेरी दुल्हन बनुन लोकांना लुटण्याचा कट रचते आणि त्यात यशस्वी ही होते .कॉमेडी, ड्रामा याचे हलके फुलके मिक्चर करुन प्रेषकांना मनोरंजन कऱण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे.


 लग्ना च्या नावावर डॉली लोकांना लुटत असते विशेष म्हणजे तिच्या या कामात  तिचे कुटुंब तिला मदत करत असते. तिच्या या प्लॅन चा पहिला शिकार बनतो तो हरियाणाचा सोनु सरावत (राजकुमार राव) . कालांतराने, मनोज (वरुण शर्मा ) ला लुटण्याचा कट रचते. तिच्या प्रत्येक कामात ती यशस्वी होते तेव्हा तिच्या या कामाची चाहुल इन्पेक्टर रॉबिन सिंह (पुलकित सम्राट) ला लागते आणि तिला अटक करण्यासाठी  शोर्धात तो लागतो. मनोरंजनाचा तडका बसावा म्हणुन आयटम गर्ल मलायतका अरोरा चे आयटम सॉंग ही यामध्ये चित्रित कऱण्यात आलेले आहे जे प्रेषकांच्या थोड्याफार प्रमाणात पसंतीस उतरत आहे.

अभिनयाच्या बाबतीत सोनम ने तिच्या कॅरेक्टर च्या मानाने ठिकठाक अभिनय केलेला आहे.
राजकुमार राव,मोहम्मद आयुप, वरुण शर्मा  राजकुमार राव यांचा ही अभिनय मनोरंजनात्मक होता.

संगीता च््या बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रपटातील संगीत ही ठितठक होते . त्यातील बाबाजी का ठुल्लु हे गाणे प्रेषकांच्या पसंतीस ही उतरत आहे. ,उत्कृष्ट संगीतकार साजिद- वाजिद ने या गाण्यांना संगीत दिले आहे.


थोडक्यात, 'डॉली की डोली ' पहावा तसा इतका मनोरंजमात्मक झाला नाही जितका तो अपेक्षित होता



Tuesday, 20 January 2015

'क्लासमेट्ची' अस्सल यारी....


दिग्दर्शक : आदित्य अजय सरपोतदार
निर्माता : सुरेश पाई,
संगीत : अमित राज, पंकज पाडघाण, अविनाश-विश्वजीत,
कलाकार : अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर, सई ताम्हणकर,
सोनाली कुलकर्णी, सचित पटेल, पल्लवी पाटील

कॉलेजची धमाल, मस्ती, मजा, कॉमेडी, प्रेमयुगलांची गुटरगु, दोस्तांची यारी,  सस्पेन्स, रोमान्स, या सर्वांचा फुल ऑन एन्टटेनिंग मसाला म्हणजे ' क्लासमेट्स'. ज्यांचे कॉलेज लाईफ चालु आहे त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जाणारा आणि ज्यांची कॉलेजची पायरी पार झाली आहे त्यांच्यासाठी त्यांच्या 'क्लासमेट्स 'ची नव्याने आठवण करुन देणाऱ्या या बहुचर्चित  अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर, सई ताम्हणकर,
सोनाली कुलकर्णी, सचित पटेल, पल्लवी पाटील कलाकारांचा अभिनय आणि कथा तुमच्या ह्दयाला  नक्कीच स्पर्श करेल.

1995 मध्ये कॉलजमध्ये असताना चे मित्र, ज्यांनी एकत्र कॉलेजच्या कट्टयावर चहाचा छोटा पॅक घेतला, मस्ती केली, मैत्री केली, कोणावर तरी जीवापाड प्रेम केले,  लेक्चरर्स बंक केले, राडा केला, आता जेव्हा तेच मित्र 20 वर्षांनी कॉलेजच्या जुन्या आठवणींना  ताजे करतात , गप्पा मारतात ..तेव्हा  अचानक त्यांचा एक मित्र अचानक टेरेस वरुन खाली पडतो. कसा पडतो,? ती आत्महत्या असते कि हत्या या हा सर्वात मोठा सस्पेन्स प्रेषकांना बांधुन ठेवतो.  तेथुन स्टोरी जाते फ्लॅशबॅक  मध्ये.
 सत्या (अंकुश चौधरी) कॉलेजचा  आणि त्यांच्या मित्रांचा हिरो, ज्याचा कॉलेजवर दरारा चालायचा,  .  सॉलेड उठावदार अभिनय , त्याचा बेधडक एटिए्युड दुनियादारी मधल्या डी.एस.पी ची आठवण करुन देतो.  तर बिंधास्त अप्पु (सई ताम्हणकर) जिच्या हातात हॉकी आणि तोंडात शिव्या सतत चिपकुन असतात जी सतत लढायला एकदम तयार,    अॅनी (सिद्धार्थ चांदेकर ) म्हणजे साधा, कोणाच्या लफड्यात नसणारा पण तो मुलगा अप्पु आणि सत्याच्या गॅंग मध्ये सामिल होतो.यामध्येही कुठेतरी आपल्याच ध्ंदीत चालणारी छोटीसी सत्या आणि अदितीची लव्हस्टोसी.. अदिती ( सोनाली कुलकर्णी) साधी पण बिनधास्त गरज पडली तर चार हात कऱणारी .. सर्व काही व्यवस्थित चालु असता एक घटना सर्वांचे आयुष्य बदलवुन जाते ज्याचा प्रत्येकाच्या जीवनावर गंभीर परिणाम पडतो आता एवढी चांगली बोंडिंग असणारे मित्र त्यांच्या लाईफमध्ये असे काय घडते या सर्व गोष्टीचा उलगडा हा चित्रपटाच्या शेवटी केलाय.  सस्पेन्स, रोमान्स, मस्ती, या सर्वांची भेळ मांडुन प्रेषकांना टक लावुन सिनेमा पाहण्याचा दिग्दर्शकांचा हा प्रयत्न यशस्वी आणि कौतुकास्पद आहे.
अभिनय :
अंकुश चौधरी चा अभिनय त्याच्या रोलनुसार एकदम परफेक्ट बसलाय. त्याचा रुबाबदार एटिट्युड हा पहायला एन्जॉय करायला प्रेषकांना फारच आवडणार यात शंकाच नाही.
सई ताम्हणकर एका बोल्ड, इमेजमधुन बाहेर पडुन बिन्धास्त, टॉमबॉय अप्पुचा अभिनय तीने केला आहे जो तिच्या पर्सनॅलिटीला सुटही होतो.
सचित पाटील ने रोहित नावाच्या शांत, समजुतदार, इंटेस अशा कॉलेज तरुणाची भुमिका वटवली आहे ज्याच्या अभिनय देखील प्रेषकांना फार आवडेल
सोनाली कुलकर्णी  ...एक अशी मुलगी जी साधी तर आहेच पण बिन्धास्त ही आहे., सोनाली च्या डान्सची झलक तुम्हाला या चित्रपटात ही पहायला मिळेल.
सिद्धार्थ चांदेकर  याचा एनी चा कॅरेक्टर मस्तच आहे.  म्हणजेच  याचा अभिनय हा प्रेषकांना हसवुन सोडणारा असुन त्याच्या कॅरेक्टरला सुट होईल अशी मजेशीर एक्टिंग त्याने  केली आहे. त्याच्या या डॅशिंग लुक मुळे त्याची फिमेल फॉलोविंग नक्कीच वाढणार.
सुशांत शेलार  कधीही कोणाच्या लफड्यात नसणारा, एकटा असणारा, प्रताप पाटील चा  अभिनय छानच होता.
सुयश टिळक  याचाही अभिनय त्याच्या ठिकाणी व्यवस्थित होता.

जबरदस्त डायलॉग
सर्वांच्या अभिनयासोबत अजुन एक गोष्ट जी प्रेषकांचे मनोरंजन करते ती म्हमजे यातील डॉयलॉग... ''माशाला पोहायला आणि बापाला शिकवायची गरज पडत नाही.''  क्षितिज पटवर्धन ने लिहिलेले यातील डॉयलॉग आता पुढे तरुणांच्या ओठावर एकायला मिळतील हे मात्र नक्की.
संगीत 
या चित्रपटातील संगीत ही सायलेंट पण एकण्याजोगे असुन अमित राज, पंकज पाडघाण, अविनाश-विश्वजीत,यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.
दिग्दर्शन
आदित्य अजय सरपोतदार यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असुन चित्रपटामध्ये जबरदस्त सस्पेन्स चा ट्विस्ट आणुन दर्शकांच्या मनात क्युरिसिटी आणण्याचा त्यांना हा प्रयत्न एकदम यशस्वी ठरलाय.

थोक्यात काय तर, एन्टटेनमेंट पॅकेज असलेल्या या क्लासमेंटला मिस न करता त्यांच्या या मस्तीमध्ये तुम्ही ही सहभागी नक्की व्हा






                                                                                                                                                                                                                           



Sunday, 18 January 2015

'मिसएन्डरस्टेडिंग' वाली लव्हस्टोरी....



दिग्दर्शक : संजय जाधव
निर्माता : इंदर राजकपुर, रेखा जोशी, दिपक राणे
संगीत : पंकज पाडघान, आमितराज आणि समीर
कलाकार  : स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर,उपेंद्र लिमये, उर्मिला कानेटकर, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले

'दुनियादारी' सारख्या प्रेंम आणि मैत्री वर भाष्य करणाऱ्या जगाला यांचे  महत्व पटवुन देणारा दिग्दर्शक  संजय जाधव यांच्या 'प्यार वाली लव्ह स्टोरी 'ने तर वेगळीचे दर्शन घडवले.

आपल्या धुंदीत राहणारा मस्तमौला अमर (स्वप्नील जोशी)  आणि स्वावलंबी , आपल्या भावावर नितांत प्रोेम करणारी बहीण, मनसोक्त जगणारी  आलिया ( सई ताम्हणकर) .
आलियाला पहिल्यांदा पाहताक्षणी अमरचे तिच्यावर प्रेंम जडते.  आपल्या प्रेमाची जाणीव तो सतत  तिला जाणवुन देत असतो . .  अमरच्या प्रेमाची जादु ही हळुहळु तिच्यावर चढतेही होते. सतत आपल्या आजुबाजुला भासणारी आपल्या जोडीदाराची छवी, प्रेमाचा भास झाला तर, रोंमान्टिक ट्युन वाजणारे वॉयलन,  अमर चे अरे, आओ ना फिररररर.. आणि आलियाचे टप्याटप्याला अमरला प्रेमाने म्हणलेले स्टुपिड हे छोटछोटे क्षण प्रेमाच्या दुनियेत घेऊन जातात. आणि काय मग, येथुन होते एका छोट्या 'प्यार वाली लव स्टोरी 'ची सुरुवात... पण, बिना अडचणीचा सामना झाल्याशिवाय यशाच्या शिखरावर पोहचलेले प्रेम हे क्वचितच..  अगदी त्याचप्रमाणे येथेही अडथळा येतो तो त्यांच्या जातीचा.अमर हिंदु आणि आलिया मुस्लिम असल्यामुळे त्यांच्या प्रेेमाला विरोध दर्शवला जातो., ..1980 त्या बहुतांश चित्रपटांप्रमाणे जाती-धर्मामुळे प्रेमयुगलांना मरण पत्कारावे लागते हीच स्टोरी पुन्हा या चित्रपटामध्ये दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न संजय जाधव यांनी केला आहे.  हिंदु आणि मुस्लिमच्या दंगलीच्या ट्विस्ट मुळे चित्रपटाचे संपर्ण स्वरुपच हलवलेले आहे. आता मग, अमर आणि आलियाचे काय होते ? त्यांचे प्रेम ते पटवुन देण्यात यशस्वी होतात का ? त्यांचे प्रेम कसे सफल होते्  की नाहीच होत?  हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळे्ल....

            अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर, स्वप्नीलचा अभिनय हा दिलखेच होता तर सई ताम्हणकर देखील वेस्टर्न लुक सोडुन पंजाबी स्टाईल मध्ये अतिशय सुंदर दिसत होती तिच्या कॅरेक्टर ला धरुन तिचा अभिनय हा छानच होता. चित्रपटात उपेंद्र लिमये, उर्मिला कानेटकर, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले यांचा ही अभिनय आहे परंतु, त्यांच्या रोल ला जास्त महत्व देिले आहे असे फारसे दिसुन येत नाही.

      स्वप्नील वर चित्रित करण्यात आलेले गाणे 'आली लहर' हे गाणे अतिशय चर्चेत आल असुन त्याचे चित्रिकरण  मजेशीर पद्धतीने करण्यात आले आहे.  चित्रपटाला संगीत पंकज पाडघान, आमितराज आणि समीर यांनी दिले आहे.





Saturday, 17 January 2015

सेक्सी बिप्स चा हाॅरर अंदाज


दिग्दर्शक : भुषण पटेल
निर्माता : कुमार मंगत
संगीत :  मिथुन, जीत गांगुली, राघव सच्चर,
कलाकार :   बिपाशा बासु, करण सिॆह ग्रोवर, नीना गुप्ता, जाकिर हुसेन.


रागिनी एमएमएस 2, 1920 एव्हिल रिटर्न, सारखे हाॅरर चित्रपट दाखवुन आता दिग्दर्शक भुषण पटेल यांनी पहिल्यांदा बाॅलिवुडची हाॅट गर्ल बिपाशा बासु आणि टेलिव्हिजन मधुन चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारा अभिनेता करण सिंह ग्रोवर यांना घेऊन प्रेषकांना पुन्हा एकदा घाबरवण्याचा प्रयत्न केलाय.  राज 3, आत्मा सारखे अनेक भयानक चित्रपट देऊन प्रेषकांच्या मनात आपली वेगळी ईमेज बनवण्यात थोड्याफार प्रमाणात यशस्वी ठरलेल्या बिपाशाचा हा प्रयत्न य़शस्वी होताना दिसतोय. अलोन हा तमिळ चित्रपट 'चारुलता ' चा अाहे.

बिपाशा या चित्रपटात संजना-अंजना या नावाच्या जुळ्या आणि एकमेकींना लहाणपणापासुन जोडलेल्या बहिणींची भुमिका साकारते ज्यांचे एकमेकांवर खुप प्रेम असते. पण, त्यांचा बालपणीचा मित्र कबीर (करण सिंह ग्रोवर) याचे संजना वर प्रेम असते आणि अंजना चे कबीर वर.. म्हणजे लव ट्रॅंगल.... कबीर चे संजनावर असलेले प्रेम अंजनाला पटत नाही . कालांतराने दोघी ऑपरेशन च्या साहाय्याने दोेघे वेगळे होतात त्यात अंजनाचा मृत्यु होतो पण , तिची आत्मा ही  दोघांना स्वस्थ बसवुन देत नाही आता बदला घेण्यासाठी अंजना कोंणत्या थराला जाते हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. चित्रपटात बिपाशा असेल आणि त्यात रोमान्स नसेल असे तर होणार नाही तर, चित्रपटात इंटिमेट आणि हॉट सिन्स देऊन प्रेषकांना थिएटरकडे आकर्षित करण्याची बिपाशाची पद्धत जुणी असली तरी काम मात्र सतत करते. हे मानले पाहिजे.

    बिपाशाचा अभिनय हा प्रेषकांना घाबरवण्यात यशस्वी ठरतो. करण चा हा पहिला चित्रपट असुन त्याचा अभिनय देखील चांगला होता.  चित्रपटातील कतरा-कतरा, आवारा गाणी ही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपट आणि खासकरुन गाण्यांकरिता लोकेशन दिग्दर्शकांनी चांगलेच निवडले आहे,

शेवटी काय तर, बिपाशाचा हॉट आणि सेक्सी अंदाज आणि टेलिव्हिजन मध्ये पहिल्यापासुनच पॉप्युलर असणाऱ्या कऱणचा रोमान्स भरा अभिनय पाहण्यासाठी जायचे असेल तर नक्की जा..

कमकुवत कथा .... मात्र तेवर जबरदस्त


दिग्दर्शक : अमित रविंद्रनाथ शर्मा
निर्माता : बोनी कपुर, संजय कपुर
संगीत : साजिद वाजिद
कलाकार :  अर्जुन कपुर, सोनाक्षी सिन्हा, मनोज वाजपेयी

नवोदित दिग्दर्शक अमित रविंद्रनाथ शर्मा यांनी प्रथमच अर्जुन कपुर आणि सोनाक्षी कपुर यांना एकत्र आणुन आपला तेवर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये अर्जुन कपुर चा तेवर मात्र कमालीचा आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणे तेवर, धमाल, मस्ती ही अपेक्षेप्रमाणे आहेच  चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थान, जयपुर, दिल्ली, आग्रा मध्ये करण्यात आलेले अाहे.
        मथुरा मधला चर्चित गुंड गजेंद्र ( मनोज वाजपेय)  आणि आग्रा मध्ये राहणारा काॅलेजचा कबड्डीपटु आणि ठिकठिकाणी आपल्या डाॅयलाॅग ने तेवर दाखवणारा, स्त्रियांवर होणारा अन्याय खपवुन न घेणारा पिंटु ( अर्जुन कपुर)  तर दुसरीकडे बबली गर्ल राधिका (सोनाक्षी सिन्हा)  या तिघांभोवती कथा फिरत राहते.  राधिका ला डान्स करता पाहताक्षणी गजेंद्र तिच्या प्रेमात पडतो आपले प्रेम जबरदस्ती लादण्याचा त्याचा हा प्रयत्न अशस्वी होतो. त्याच्या जबरदस्तीच्या जाचाला कंटाळुन तिचे कुटुंब तिला अमेरिकेला पाठवतात. पण, मध्येच काणाकोपऱ्यातुन शोधुन गजेंद्र तिला दिल्लीत पकडतो राधिका वर होणारा भर रस्यात होणारा अन्याय पाहणारा हिरो कसला ...? मग त्यात पिंटु ने मारली उडी मैदानात धरला राधिका चा हात जो धरला तो मात्र सोडला नाही. हिरो- हिरोईन प्रेमात पडल्यानंतर धावतात पण या जोडप्यांना धावता धावता प्रेेम होते. हिरो आणि विलनचा पकडा पकडी चा खेळ , याच्या व्यतिरिक्त काही नवे असे पाहण्यासारखे नाहीये.. सुरुवात मजेशीर वाटते पण, इंटरवल नंतर सिनेमा बोरिंग होत जातो.  दिग्दर्शक अंमित  रविंद्रनाथ शर्मा यांचा हा पहिला सिनेमा असला तरी, चित्रपटाला काही नवे रुप देण्यात, नवी भर टाकण्यात कमीपणा आहे हे सतत जाणवते.
     अभिनयाच्या बाबतीत अर्जुन आणि मनोज वाजपेयी  ने मात्र बाजी मारली.  अर्जुन ने त्याची हिरोगीरी त्याचा तेवर त्याची डायलाॅगबाजी ही शेवटपर्यंत कायम ठेवली. मनोज वाजपेयी सारख्या इंटेस कलाकाराने त्याच्या कॅरेक्टला योग्य न्याय दिलाय. सोनाक्षी चा रोल हा चॅलेंजिंग नव्हता पण अभिनय चांगलाच होता.
   चित्रपटातील गाणे सुपरमॅन तर प्रेषकांच्या पसंतीस उतरले आहे. श्रुती हसन ने केलेला आयटमसाॅंग मॅडमिया साॅंग हे देखील मनोरंजित आहे. गाण्यांमुऴे चित्रपटात थोडा रस असल्यासारखे वाटते. सुप्रसिद्ध संगीतकार साजिद वाजिद यांनी संगीत दिले आहे.
    थोडक्यात काय तर, कमकुवत कथा असली तरी,  त्यात अर्जुन चा तेवर  आणि अॅक्टिंग ही पैसे वसुल आहे. त्यासाठी सिनेमा पाहण्याची तसदी घ्यायला काही हरकत नाही.








Friday, 16 January 2015

पी. के इज ऩाॅ़ट वेस्ट आॅफ टाईम.....

दिग्दर्शक : राजकुमार हिराणी
नर्माता : विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी
संगीत : अजय-अतुल, अंकित तिवारी.
 कलाकार : आमिर खान, अनुष्का शर्मा, संजय दत्त.


आमिर खानच्या पी.के ची चर्चा ही सर्वत्र इतकी रंगली आहे की, तो पी.के मध्ये एलियन ची भुमिका रंगवतोय याची चाहुल तर प्रेेषकांना लागलीच असणार पण, हा काय जादु जादु म्हणारा एलियन नव्हे तर, त्याच्या आगळ्या-वेगळ्या वागण्याने , त्याच्या भोजपुरी बोलण्याने लोकांना पी के है क्या म्हणवणारा एलियन आहे.जो सर्व सामान्य लोकांमध्ये राहुन त्यांच्या विषयी रिसर्च करण्याकरिता आला असतो सुरुवातीलाच  त्याचे लॅाकेट चोरीला जाते आणि पुन्हा आपल्या विश्वात जायचे असेल तर त्याला ते लाॅकेट मिळवणे गरजेचे होते. तर दुसऱ्या बाजुला  जगत जननी म्हणजेच जग्गु   ( अनुष्का शर्मा) जग्गु  ही शिक्षणाकरिता तिच्या कुटुंबापासुन दुर बेल्जियम मध्ये राहते .दरम्यान तिची ओळख सरफराज (सुशांत सिंह राजपुत) सोबत होते दोघांचे प्रेम जुळते.त्यांच्या प्रेमाला जग्गुच्या घरच्यांचा विरोध असतो कारण म्हणजे, जग्गु च्या वडिलांचा तपस्वी महाराज( सौरभ शुक्ला)  या बाबांवरचा विश्वास. त्यांच्या म्हण्यानुसार त्यांचा दिनक्रम सुरु होत असतो. महारांच्या आदेशानुसार सरफराज हा जग्गुला धोका देणार असतो आणि घडते ही तसेच सरफराज तिला प्रेमामध्ये धोका देतो आणि  त्या दुखावलेल्या अवस्थेत जग्गु दिल्लीला येऊन एक न्युज चैनल मध्ये नोकरी करते. तेथेच दिल्ली ला पी.के (आमिर खान) चा आगळावेगळा लुक, त्याचे विचित्र वागणे पाहुन तिला त्याच्यावर एक स्टोरी बनावी असे वाटते  आणि त्यासाठी तो काेण आहे हे जाणुन घेणे तिच्यासाठी महत्वाचे असते त्याच्याकडुन जेव्हा कळते की तो दुसऱ्या ग्रहावरुन आला आहे, त्याचे लाॅकेट हरवले आहे हे एकुन तिला काही तिच्यावर विश्वास बसत नाही पण, पी.के तिला विश्वासात घेण्यात यशस्वी ठरतो आणि काय येथुन सुरु होते मेन विषयाला आणि ती म्हणजे भाबडी अंध्रश्रद्धा .. देवाच्या नावावर लोकांकडुन पैसे काढणे, त्यांना फसवणे देव दोन प्रकारचे असतात सांगुन देवांवर धंदा करणाऱ्या लोकांवर कशी वाचा  फोडली आहे याचे चित्रिकरण राजकुमार हिराणी ने अगदी चोखपणे केले आहे. ,या अंधश्रद्धेवर लोकांचा विश्वास का आणि कसा बसतो हे देखील सोप्या भाषेत आणि मनोरंजन पद्दतीने आपल्यासमोर मांडले आहे. आजही आपल्या आजुबाजुला अशा ढोंगी माणसांचा वावर कायम असुन महाराज सारखे असे कित्येक लबाड  असतात जे भोळ्या भाबड्या लोकांच्या भावनांशी खेळतात, त्यांना भविष्याची खोटी आस दाखवतात. माणुस हा स्वकर्माने मोठा होतो कर्म करा त्याचे फळ तुम्हाला नक्कीू मिळेल हेच दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. आता हे दोघे मिऴुन तपस्वी चा ढोंगी राॅंग नंबर कसा लोकांसमोर आणतात ? हे तुम्हाला एेकण्या एवजी पाहायला नक्कीच जास्त आवडेल.
         परफेक्शनिस्ट आमिर ने एकदम परफेक्ट अशी एलियनची भुमिका निभावली आहे त्याचा हा वेगळा लुक आणि भोजपुरी बोलण्याची स्टाईलने प्रेषकांंना चांगलेच आकर्षित केले. .अनुष्का चे बारिक केस प्रिटी लुक देखील तिच्या कॅरेक्टला साजेसा होता तिने देखील तिच्या अभिनयाला पुरेपुर न्याय दिलाय. सुशांत सिंह राजपुत ची  भुमिका छोटी पण, महत्वाची होती .संजय दत्त ने पी.के च्या मित्राची भुमिका लहान पण,  भुमिका होती.
    चित्रपटातील 'चार कदम' हे गाणे फारच चर्चित झाले आहे. सुशांत आणि अनुष्का वर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. तर 'नंगा पुंगा दोस्त' हे देखील  मजेशीर वाटते. चित्रपटाला संगीत मराठी जगतातील  फेमस जोडी अजय अतुल आणि चर्चित संगीतकार अंकित तिवारी ने दिले आहे.
     तर, मित्रांनो पिऊन नसणाऱ्या पी. के चा फुल टु धमाल आणि आमिर चा हा नवा अंदाज नक्कीच पाहा. कारण, पी.के   इज ऩाॅ़ट वेस्ट आॅफ टाईम.....