Monday, 16 February 2015

प्रेमा ची परिभाषा म्हणजे 'मितवा'


दिग्दर्शिका : स्वप्ना वाघमारे जोशी
निर्माता :  मिनाक्षी सागर, अम़ृत सागर,आकाश चोप्रा, शेखर ज्योती.
कलाकार : स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे.

मितवा - मित्र तत्वज्ञ वा़टाड्या स्वप्नील जोशीच्या या मितवा मधील शब्दांनी अख्या महाराष्ट्रातील तरुणाईला वेडावुन सोडले होते ,तो 'मितवा' नुकताच प्रदर्शित झालाय. मुळात प्रेम हा सर्व चित्रपटांमध्ये कॉमन शब्द असतो पण,कथेेत त्याची मांडणी दिग्दर्शक कशा प्रकारे करतो हि त्यांची परिक्षा असते आणि त्यात दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांनी स्वत ला चांगलेच सिद्द केलंय. चित्रपटाचे प्रोेमोज पाहताना याचा प्रत्यय येतोच की, यात प्रेमाचा त्रिकोण आहे, हे साहजिक आपल्याला प्रत्येक चित्रपटांमध्ये पाहायला मिळते पण, यामध्ये ही काहीसे वेगळेपण आहे , प्रेमात असतानाचा आनंद, कालांतराने ते दुरावल्याने होणारे दुख, ड्रामा,ट्रेजडी,रुसवा या सर्वांचे मिश्रण करुन बनवण्यात आलेला हा करण जोहर टाईप सिनेमा प्रत्येकाला काहीना काही प्रेमाचे धडे देऊन जाणारा आहे एवढे मात्र नक्की..आपण ज्यांच्यांवर प्रेम करतो तो सतत आपल्याजवळ असण्यापेक्षा त्याचा काही काळापुरता सहवास हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, असेच काहीसे सांगण्याचा प्रयत्न स्वप्ना वाघमारे यांनी सांगितलाय. त्याचे प्रेम जरी आपल्या सोबत नसेल तर त्याची बांधिलकी आपल्याकडे असते.

  तिचं कर्तव्य तिथे असले ना... तरी तिचं प्रेम इथे आहे.
  तिची बांधिलकी तिथे असली....तरी तिचामितवा इथे आहे

     
हिंदी सृष्टीतील छोट्या पडद्यावर यशस्वी काम करणारी दिग्दर्शिका स्वप्ना जोशी वाघमारे यांनी पहिल्यांदाच मितवा या रोमांटिक चित्रपटातुन मराठी सिनेस़ृष्टीत दिग्दर्शिका म्हणुन पाऊल टाकले आहे. तरुणाईचा इंट्रेस लक्षात घेऊन आजच्या पिढीला काय आवडेल, आणि त्याचबरोबर प्रेमातुन ही काहीसे धडे मिळतील याचा एकत्रित विचार करुन सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 
      (स्वप्निल जोशी )शिवम सारंग दिलफेक, अय्याश पण एका आलिशान रेसोर्ट चा मालक ज्याला प्रेम, लग्न, कमेटमेंट या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. तर दुसरीकडे अवनी (प्रार्थना बेहरे)  त्याची सहकारी आणि मैत्रीण ही.. ज्यांचे नाते हे मैत्रीच्या थोडे पलिकडे तर प्रेंमाच्या थोडे अलिकडचे. अवनी जिचे शिवम वर प्रेम असते. आता या दोघांच्या मैत्रीमध्ये एन्ट्री होते ती नंदनी ची (सोनाली कुलकर्णी) ची जी शिवम च्या ऑफिस मध्ये नोकरीकरिता  आली असते अत्यंत साधी, सरळ.. सोनाली चे शिवम कडे डुंकुन ही न पाहणे,त्याला अस्वस्थ करते नकळत तो ति्च्याकडे् ओढला जातो तिच्यावर प्रेम करु लागतो शेवटी त्याच्या ही प्रेमाची छाप साेनाली वर पडतेच पण, एक गोष्ट असते जी तिला त्याच्याकडे जाण्यास मज्जाव करत असते आणि त्याचा उलगडा होतो तो फ्लॅशबॅक मध्ये,.....भुतकाळातील घटनेमुळे तिचे पाय शिवम कडे सरसावत नसतात...आणि ते नक्की काय आहे हाच आहे 'मितवा' चा सस्पेन्स...
      स्वप्निल जोशी ने शिवम हा कॅरेक्टर चांगलाच जमावलाय. त्याच्या या प्लेबॉय ईमेज त्याची फिमेल फॉलोविंग मध्ये अजुन वाढ होईल हे मात्र नक्की.  तर,  लक्स झक्कास हिरोईम मधुन विजेती बनलेली अभिनेत्री प्रार्थना बहिरे ने ही स्वत ला चांगलेच सिद्ध केलंय.. क्लासमेट्स नंतर अत्यंत वेगळ्या रुपात येऊन आपली साधी छाप पाडण्यात सोनाली कुलकर्णी ही यशस्वी ठरली. तर, संग्राम साळवी, इला भाटे, करुणा ईराणी यांच्य़ा छोट्या भुमिका ही अप्रतिम होत्या.
       त्याचबरोबर चित्रपटातील गाण्यांकरिता निवडण्यात आलेले लोकेशन्स देखील अप्रतिम आणि त्यामुळे  गाणी पाहण्यास आतुरता वाटते. त्याला सुरेख जोड मिळाली ती, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार शंकर, एहसान, लॉय, आणि निलेश मोहरीर, अमित राज,पंकज पाडघाण, यांच्या संगीताच्या स्पर्शाने चित्रपटाच्या गाण्यांना चाॅंद चाॅंद लावलं. मोजुन फक्त 5 गाणी असलेल्या या चित्रपटात गाण्यांची माडंणी कुठे आणि कशी करायची याची चांगलीच दखल दिग्दर्शक ने घेतली आहे. सावर रे, मितवा, सत्यम शिवम सुंदरम, हे गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठांवर नाचत आहे.
थोडक्यात काय तर, प्रेमाच्या दिवसात आपल्या जोडीदारासोबत अर्थात आपल्या मितवा सोबत प्रेमाची परिभाषा जाणुन घ्यायला मितवा पाहायलाच हवा
   
      

No comments:

Post a Comment