
निर्माता : दिनेश विजन, सिनील लुल्ला
कलाकार : वरुण धवन, यामी गौतमी, हिमा कुरेशी, नवाजुद्दीन सिद्धिकी
'डोट मिस द बिगिनिंग' ही खेचक टॅगलाईन प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यासाठी पुरेशी असताना त्यात चाॅकलेट बॉय वरुणची थरारक सिरिअस टाईप भुमिका चित्रपटाला अजुन रंगवुन देते. एक हसिना थी.जॉनी गद्दा सारखे चित्रपट केल्यानंतर आता दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी पहिल्यांदा असा थ्रिलर चित्रपट काढलाय. साधारण पणे चित्रपटाच्या नाव आणि प्रोमोवरुण या मध्ये बदला प्रकरण आहे याचा प्रत्यय येतोच.
रघु (वरुण धवन) आणि त्याची पत्नि निशा ( यामी गौतम) त्यांचा मुलगा हे तिघांचे मिळुन सुखी कुटुंब असते. एका बॅंकेमध्ये दरोडा घातलेल्या चोरांकडुन निशा आणि तिच्या मुलाचा खुन होतो. आपल्या कुटुंबाला आपल्या डोळ्यासमोर डोळे बंद करताना पाहुन रघु मारेकऱ्यांचा शोध घेतो. दरम्यान पोलिस लायक (नवाजुद्दीन सिद्धिकी) ला पोलिस पकडतात. जेव्हा लायक जेलमधुन सुटतो तेव्हा तो त्याचा शोध घेतो. तर तो त्यासाठी काय प्रयत्न करतो, तो बदला घेण्यात यशस्वी होतो का ? त्याला त्य़ा दरम्यान कोणकोणत्या आव्हानांना सोमोरे जावे लागते हेच सगळे या सिनेमामध्ये दिग्दर्शकाने मांडले आहे.
वरुण ने त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासुन लव्हरबाॅय, रोमांटिक भुमिका केल्या आहेत त्याचा सिरिअस, इंटेंस अभिनय त्याने पुरेपुर निभावलाय. लव्हरबाॅय सोबतच अनेक प्रकारच्या भुमिका करण्यात तो सक्षम आहे हे त्याने सिद्द केलेय. त्याचबरोबर, नवाजुद्दीन ने देखील खलनायकाची भुमिका साॅलेड केलीय. तर, हुमा कुरेशी हिने वैश्या ची भुमिका कॅरक्टरला सुट होईल अशी केली आहे. मराठी मधील अभिनेत्री राधिका आपटे हिची ही छोटी भुमिका चांगली होती.
चित्रपटातील संगीत जी करदा, जीना जीना गाणे हे आजही तेवढेच हिट चालु आहे.सिनेमा ला सचिन जीगर यांनी संगीत दिले आहे.
थोडक्यात, तुम्हाला जर वरुण चा हा नवा थरारक, अग्रेसिव साईड पाहायची असेल तर सिनेमा जरुर पाहा.
No comments:
Post a Comment