दिग्दर्शन : आर. बाल्की
निर्माता : सुनिल लुल्ला, आर. बाल्की,राकेश झुंझुनवाला.
कलाकार : अमिताभ बच्चन, धनुष, अक्षरा हसन
अगळा वेगळा अंदाज आणि हटके भुमिका करण्याचा अमिताभ बच्चन चा फॉमुला नेहमीच काम करतो. चिनी कम आणि पा सारखे हटके सिनेमा दिणारे दिग्दर्शक आर. बाल्की हे पुन्हा नवीन थिम घेऊन आपल्या समोर आलेत.
दानिश (धनुष) ज्याला अभिनय आणि चित्रपटांचा फार क्रेझ असतो, त्याची हिच आवड त्याला मुंबईला घेऊन येते. तेथे त्याची ओळख होते असिस्टंट डायरेक्टर अक्षरा सोबत. आणि मग, तिच्या सहाय्याने दानिश आपले स्वप्न पुर्ण करु पाहतो. तर दुसरीकडे अमिताभ सिन्हा (अमिताभ बच्चन) ज्यांना एक्टर बनायचे असते,,रोजचा स्ट्रगल आणि संघर्ष त्यांना दारुच्या आहारी घेऊन जातो. दानिष हा मुका असल्याने त्याला कुठेही काम मिळत नसते मग तेव्हा अमिताभ चा आवाज आणि दानिष चा बेतोड अभिनय म्हणजे 'शमिताभ' चा झक्कास केमेस्ट्री येथे प्रेक्षकांना पहायला मिळणार.
चिनी कम, पा सारखे चित्रपट केल्यानंतर नवीन प्रयोग आर. बाल्की यांनी केलाय.आवाज एकाचा आणि अभिनय एकाचा याची एकत्र ट्युनिंग अगदी अचुकपणे मिळवुन आणणे सोपे नाही पण त्यांनी हे चांगलेच जमवुण आणले आहे.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन यांनीस्टगलिंग एक्टर आणि दारुडा व्यक्तिचा अभिनय मस्तच केलाय त्याचबरोबर त्याला तडका मिळालाय तो त्यांचा विनोदी पणाचा. आणि अमिताभ यांच्या आवाजाचा पिदली सी बाते हे त्यांच्या आवाजातले गाणे सध्या चर्चित झालेय. म्हणजे सोने पे सुहागा. तर, धनुष ने देखील त्याच्या अभिनयाला पुरता न्याय दिलाय. अक्षरा हसन चा पहिलाच सिमेमा असुन तिच्या वाटेला आलेला रोल तिने चांगलाच सांभाळलाय.
थोडक्यात, वेगळी आणि मनोरंजनात्मक कथा आणि अमिताभ बच्चन आणि धनुष चा उत्कृष्ट अभिनय, केमेस्ट्री तुमचे मनोरंजन करेलच.
No comments:
Post a Comment