
दिग्दर्शक : अमित रविंद्रनाथ शर्मा
निर्माता : बोनी कपुर, संजय कपुर
संगीत : साजिद वाजिद
कलाकार : अर्जुन कपुर, सोनाक्षी सिन्हा, मनोज वाजपेयी
नवोदित दिग्दर्शक अमित रविंद्रनाथ शर्मा यांनी प्रथमच अर्जुन कपुर आणि सोनाक्षी कपुर यांना एकत्र आणुन आपला तेवर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये अर्जुन कपुर चा तेवर मात्र कमालीचा आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणे तेवर, धमाल, मस्ती ही अपेक्षेप्रमाणे आहेच चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थान, जयपुर, दिल्ली, आग्रा मध्ये करण्यात आलेले अाहे.
मथुरा मधला चर्चित गुंड गजेंद्र ( मनोज वाजपेय) आणि आग्रा मध्ये राहणारा काॅलेजचा कबड्डीपटु आणि ठिकठिकाणी आपल्या डाॅयलाॅग ने तेवर दाखवणारा, स्त्रियांवर होणारा अन्याय खपवुन न घेणारा पिंटु ( अर्जुन कपुर) तर दुसरीकडे बबली गर्ल राधिका (सोनाक्षी सिन्हा) या तिघांभोवती कथा फिरत राहते. राधिका ला डान्स करता पाहताक्षणी गजेंद्र तिच्या प्रेमात पडतो आपले प्रेम जबरदस्ती लादण्याचा त्याचा हा प्रयत्न अशस्वी होतो. त्याच्या जबरदस्तीच्या जाचाला कंटाळुन तिचे कुटुंब तिला अमेरिकेला पाठवतात. पण, मध्येच काणाकोपऱ्यातुन शोधुन गजेंद्र तिला दिल्लीत पकडतो राधिका वर होणारा भर रस्यात होणारा अन्याय पाहणारा हिरो कसला ...? मग त्यात पिंटु ने मारली उडी मैदानात धरला राधिका चा हात जो धरला तो मात्र सोडला नाही. हिरो- हिरोईन प्रेमात पडल्यानंतर धावतात पण या जोडप्यांना धावता धावता प्रेेम होते. हिरो आणि विलनचा पकडा पकडी चा खेळ , याच्या व्यतिरिक्त काही नवे असे पाहण्यासारखे नाहीये.. सुरुवात मजेशीर वाटते पण, इंटरवल नंतर सिनेमा बोरिंग होत जातो. दिग्दर्शक अंमित रविंद्रनाथ शर्मा यांचा हा पहिला सिनेमा असला तरी, चित्रपटाला काही नवे रुप देण्यात, नवी भर टाकण्यात कमीपणा आहे हे सतत जाणवते.
अभिनयाच्या बाबतीत अर्जुन आणि मनोज वाजपेयी ने मात्र बाजी मारली. अर्जुन ने त्याची हिरोगीरी त्याचा तेवर त्याची डायलाॅगबाजी ही शेवटपर्यंत कायम ठेवली. मनोज वाजपेयी सारख्या इंटेस कलाकाराने त्याच्या कॅरेक्टला योग्य न्याय दिलाय. सोनाक्षी चा रोल हा चॅलेंजिंग नव्हता पण अभिनय चांगलाच होता.
चित्रपटातील गाणे सुपरमॅन तर प्रेषकांच्या पसंतीस उतरले आहे. श्रुती हसन ने केलेला आयटमसाॅंग मॅडमिया साॅंग हे देखील मनोरंजित आहे. गाण्यांमुऴे चित्रपटात थोडा रस असल्यासारखे वाटते. सुप्रसिद्ध संगीतकार साजिद वाजिद यांनी संगीत दिले आहे.
थोडक्यात काय तर, कमकुवत कथा असली तरी, त्यात अर्जुन चा तेवर आणि अॅक्टिंग ही पैसे वसुल आहे. त्यासाठी सिनेमा पाहण्याची तसदी घ्यायला काही हरकत नाही.
No comments:
Post a Comment