दिग्दर्शक : आदित्य अजय सरपोतदार
निर्माता : सुरेश पाई,
संगीत : अमित राज, पंकज पाडघाण, अविनाश-विश्वजीत,
कलाकार : अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर, सई ताम्हणकर,
सोनाली कुलकर्णी, सचित पटेल, पल्लवी पाटील
कॉलेजची धमाल, मस्ती, मजा, कॉमेडी, प्रेमयुगलांची गुटरगु, दोस्तांची यारी, सस्पेन्स, रोमान्स, या सर्वांचा फुल ऑन एन्टटेनिंग मसाला म्हणजे ' क्लासमेट्स'. ज्यांचे कॉलेज लाईफ चालु आहे त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जाणारा आणि ज्यांची कॉलेजची पायरी पार झाली आहे त्यांच्यासाठी त्यांच्या 'क्लासमेट्स 'ची नव्याने आठवण करुन देणाऱ्या या बहुचर्चित अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर, सई ताम्हणकर,
सोनाली कुलकर्णी, सचित पटेल, पल्लवी पाटील कलाकारांचा अभिनय आणि कथा तुमच्या ह्दयाला नक्कीच स्पर्श करेल.
1995 मध्ये कॉलजमध्ये असताना चे मित्र, ज्यांनी एकत्र कॉलेजच्या कट्टयावर चहाचा छोटा पॅक घेतला, मस्ती केली, मैत्री केली, कोणावर तरी जीवापाड प्रेम केले, लेक्चरर्स बंक केले, राडा केला, आता जेव्हा तेच मित्र 20 वर्षांनी कॉलेजच्या जुन्या आठवणींना ताजे करतात , गप्पा मारतात ..तेव्हा अचानक त्यांचा एक मित्र अचानक टेरेस वरुन खाली पडतो. कसा पडतो,? ती आत्महत्या असते कि हत्या या हा सर्वात मोठा सस्पेन्स प्रेषकांना बांधुन ठेवतो. तेथुन स्टोरी जाते फ्लॅशबॅक मध्ये.
सत्या (अंकुश चौधरी) कॉलेजचा आणि त्यांच्या मित्रांचा हिरो, ज्याचा कॉलेजवर दरारा चालायचा, . सॉलेड उठावदार अभिनय , त्याचा बेधडक एटिए्युड दुनियादारी मधल्या डी.एस.पी ची आठवण करुन देतो. तर बिंधास्त अप्पु (सई ताम्हणकर) जिच्या हातात हॉकी आणि तोंडात शिव्या सतत चिपकुन असतात जी सतत लढायला एकदम तयार, अॅनी (सिद्धार्थ चांदेकर ) म्हणजे साधा, कोणाच्या लफड्यात नसणारा पण तो मुलगा अप्पु आणि सत्याच्या गॅंग मध्ये सामिल होतो.यामध्येही कुठेतरी आपल्याच ध्ंदीत चालणारी छोटीसी सत्या आणि अदितीची लव्हस्टोसी.. अदिती ( सोनाली कुलकर्णी) साधी पण बिनधास्त गरज पडली तर चार हात कऱणारी .. सर्व काही व्यवस्थित चालु असता एक घटना सर्वांचे आयुष्य बदलवुन जाते ज्याचा प्रत्येकाच्या जीवनावर गंभीर परिणाम पडतो आता एवढी चांगली बोंडिंग असणारे मित्र त्यांच्या लाईफमध्ये असे काय घडते या सर्व गोष्टीचा उलगडा हा चित्रपटाच्या शेवटी केलाय. सस्पेन्स, रोमान्स, मस्ती, या सर्वांची भेळ मांडुन प्रेषकांना टक लावुन सिनेमा पाहण्याचा दिग्दर्शकांचा हा प्रयत्न यशस्वी आणि कौतुकास्पद आहे.
अभिनय :
अंकुश चौधरी चा अभिनय त्याच्या रोलनुसार एकदम परफेक्ट बसलाय. त्याचा रुबाबदार एटिट्युड हा पहायला एन्जॉय करायला प्रेषकांना फारच आवडणार यात शंकाच नाही.
सई ताम्हणकर एका बोल्ड, इमेजमधुन बाहेर पडुन बिन्धास्त, टॉमबॉय अप्पुचा अभिनय तीने केला आहे जो तिच्या पर्सनॅलिटीला सुटही होतो.
सचित पाटील ने रोहित नावाच्या शांत, समजुतदार, इंटेस अशा कॉलेज तरुणाची भुमिका वटवली आहे ज्याच्या अभिनय देखील प्रेषकांना फार आवडेल
सोनाली कुलकर्णी ...एक अशी मुलगी जी साधी तर आहेच पण बिन्धास्त ही आहे., सोनाली च्या डान्सची झलक तुम्हाला या चित्रपटात ही पहायला मिळेल.
सिद्धार्थ चांदेकर याचा एनी चा कॅरेक्टर मस्तच आहे. म्हणजेच याचा अभिनय हा प्रेषकांना हसवुन सोडणारा असुन त्याच्या कॅरेक्टरला सुट होईल अशी मजेशीर एक्टिंग त्याने केली आहे. त्याच्या या डॅशिंग लुक मुळे त्याची फिमेल फॉलोविंग नक्कीच वाढणार.
सुशांत शेलार कधीही कोणाच्या लफड्यात नसणारा, एकटा असणारा, प्रताप पाटील चा अभिनय छानच होता.
सुयश टिळक याचाही अभिनय त्याच्या ठिकाणी व्यवस्थित होता.
जबरदस्त डायलॉग
सर्वांच्या अभिनयासोबत अजुन एक गोष्ट जी प्रेषकांचे मनोरंजन करते ती म्हमजे यातील डॉयलॉग... ''माशाला पोहायला आणि बापाला शिकवायची गरज पडत नाही.'' क्षितिज पटवर्धन ने लिहिलेले यातील डॉयलॉग आता पुढे तरुणांच्या ओठावर एकायला मिळतील हे मात्र नक्की.
संगीत
या चित्रपटातील संगीत ही सायलेंट पण एकण्याजोगे असुन अमित राज, पंकज पाडघाण, अविनाश-विश्वजीत,यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.
दिग्दर्शन
आदित्य अजय सरपोतदार यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असुन चित्रपटामध्ये जबरदस्त सस्पेन्स चा ट्विस्ट आणुन दर्शकांच्या मनात क्युरिसिटी आणण्याचा त्यांना हा प्रयत्न एकदम यशस्वी ठरलाय.
थोक्यात काय तर, एन्टटेनमेंट पॅकेज असलेल्या या क्लासमेंटला मिस न करता त्यांच्या या मस्तीमध्ये तुम्ही ही सहभागी नक्की व्हा
No comments:
Post a Comment