दिग्दर्शक : अभिषेक डोगरा
निर्माता : अरबाज खान
संगीत : साजिद वाजिद,
कलाकार : सोनम कपुर, राजकुमार राव, पुलकित सम्राट, वरुण शर्मा
अभिषेक डोगरा दिग्दर्शित डॉली की डोली हा सिनेमा एक अशा कथेवर आधारित आहे ज्यात डॉली (सोनम कपुर) पैशासाठी लुटेरी दुल्हन बनुन लोकांना लुटण्याचा कट रचते आणि त्यात यशस्वी ही होते .कॉमेडी, ड्रामा याचे हलके फुलके मिक्चर करुन प्रेषकांना मनोरंजन कऱण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे.
लग्ना च्या नावावर डॉली लोकांना लुटत असते विशेष म्हणजे तिच्या या कामात तिचे कुटुंब तिला मदत करत असते. तिच्या या प्लॅन चा पहिला शिकार बनतो तो हरियाणाचा सोनु सरावत (राजकुमार राव) . कालांतराने, मनोज (वरुण शर्मा ) ला लुटण्याचा कट रचते. तिच्या प्रत्येक कामात ती यशस्वी होते तेव्हा तिच्या या कामाची चाहुल इन्पेक्टर रॉबिन सिंह (पुलकित सम्राट) ला लागते आणि तिला अटक करण्यासाठी शोर्धात तो लागतो. मनोरंजनाचा तडका बसावा म्हणुन आयटम गर्ल मलायतका अरोरा चे आयटम सॉंग ही यामध्ये चित्रित कऱण्यात आलेले आहे जे प्रेषकांच्या थोड्याफार प्रमाणात पसंतीस उतरत आहे.
अभिनयाच्या बाबतीत सोनम ने तिच्या कॅरेक्टर च्या मानाने ठिकठाक अभिनय केलेला आहे.
राजकुमार राव,मोहम्मद आयुप, वरुण शर्मा राजकुमार राव यांचा ही अभिनय मनोरंजनात्मक होता.
संगीता च््या बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रपटातील संगीत ही ठितठक होते . त्यातील बाबाजी का ठुल्लु हे गाणे प्रेषकांच्या पसंतीस ही उतरत आहे. ,उत्कृष्ट संगीतकार साजिद- वाजिद ने या गाण्यांना संगीत दिले आहे.
थोडक्यात, 'डॉली की डोली ' पहावा तसा इतका मनोरंजमात्मक झाला नाही जितका तो अपेक्षित होता
No comments:
Post a Comment