नर्माता : विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी
संगीत : अजय-अतुल, अंकित तिवारी.
कलाकार : आमिर खान, अनुष्का शर्मा, संजय दत्त.
आमिर खानच्या पी.के ची चर्चा ही सर्वत्र इतकी रंगली आहे की, तो पी.के मध्ये एलियन ची भुमिका रंगवतोय याची चाहुल तर प्रेेषकांना लागलीच असणार पण, हा काय जादु जादु म्हणारा एलियन नव्हे तर, त्याच्या आगळ्या-वेगळ्या वागण्याने , त्याच्या भोजपुरी बोलण्याने लोकांना पी के है क्या म्हणवणारा एलियन आहे.जो सर्व सामान्य लोकांमध्ये राहुन त्यांच्या विषयी रिसर्च करण्याकरिता आला असतो सुरुवातीलाच त्याचे लॅाकेट चोरीला जाते आणि पुन्हा आपल्या विश्वात जायचे असेल तर त्याला ते लाॅकेट मिळवणे गरजेचे होते. तर दुसऱ्या बाजुला जगत जननी म्हणजेच जग्गु ( अनुष्का शर्मा) जग्गु ही शिक्षणाकरिता तिच्या कुटुंबापासुन दुर बेल्जियम मध्ये राहते .दरम्यान तिची ओळख सरफराज (सुशांत सिंह राजपुत) सोबत होते दोघांचे प्रेम जुळते.त्यांच्या प्रेमाला जग्गुच्या घरच्यांचा विरोध असतो कारण म्हणजे, जग्गु च्या वडिलांचा तपस्वी महाराज( सौरभ शुक्ला) या बाबांवरचा विश्वास. त्यांच्या म्हण्यानुसार त्यांचा दिनक्रम सुरु होत असतो. महारांच्या आदेशानुसार सरफराज हा जग्गुला धोका देणार असतो आणि घडते ही तसेच सरफराज तिला प्रेमामध्ये धोका देतो आणि त्या दुखावलेल्या अवस्थेत जग्गु दिल्लीला येऊन एक न्युज चैनल मध्ये नोकरी करते. तेथेच दिल्ली ला पी.के (आमिर खान) चा आगळावेगळा लुक, त्याचे विचित्र वागणे पाहुन तिला त्याच्यावर एक स्टोरी बनावी असे वाटते आणि त्यासाठी तो काेण आहे हे जाणुन घेणे तिच्यासाठी महत्वाचे असते त्याच्याकडुन जेव्हा कळते की तो दुसऱ्या ग्रहावरुन आला आहे, त्याचे लाॅकेट हरवले आहे हे एकुन तिला काही तिच्यावर विश्वास बसत नाही पण, पी.के तिला विश्वासात घेण्यात यशस्वी ठरतो आणि काय येथुन सुरु होते मेन विषयाला आणि ती म्हणजे भाबडी अंध्रश्रद्धा .. देवाच्या नावावर लोकांकडुन पैसे काढणे, त्यांना फसवणे देव दोन प्रकारचे असतात सांगुन देवांवर धंदा करणाऱ्या लोकांवर कशी वाचा फोडली आहे याचे चित्रिकरण राजकुमार हिराणी ने अगदी चोखपणे केले आहे. ,या अंधश्रद्धेवर लोकांचा विश्वास का आणि कसा बसतो हे देखील सोप्या भाषेत आणि मनोरंजन पद्दतीने आपल्यासमोर मांडले आहे. आजही आपल्या आजुबाजुला अशा ढोंगी माणसांचा वावर कायम असुन महाराज सारखे असे कित्येक लबाड असतात जे भोळ्या भाबड्या लोकांच्या भावनांशी खेळतात, त्यांना भविष्याची खोटी आस दाखवतात. माणुस हा स्वकर्माने मोठा होतो कर्म करा त्याचे फळ तुम्हाला नक्कीू मिळेल हेच दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. आता हे दोघे मिऴुन तपस्वी चा ढोंगी राॅंग नंबर कसा लोकांसमोर आणतात ? हे तुम्हाला एेकण्या एवजी पाहायला नक्कीच जास्त आवडेल.
परफेक्शनिस्ट आमिर ने एकदम परफेक्ट अशी एलियनची भुमिका निभावली आहे त्याचा हा वेगळा लुक आणि भोजपुरी बोलण्याची स्टाईलने प्रेषकांंना चांगलेच आकर्षित केले. .अनुष्का चे बारिक केस प्रिटी लुक देखील तिच्या कॅरेक्टला साजेसा होता तिने देखील तिच्या अभिनयाला पुरेपुर न्याय दिलाय. सुशांत सिंह राजपुत ची भुमिका छोटी पण, महत्वाची होती .संजय दत्त ने पी.के च्या मित्राची भुमिका लहान पण, भुमिका होती.
चित्रपटातील 'चार कदम' हे गाणे फारच चर्चित झाले आहे. सुशांत आणि अनुष्का वर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. तर 'नंगा पुंगा दोस्त' हे देखील मजेशीर वाटते. चित्रपटाला संगीत मराठी जगतातील फेमस जोडी अजय अतुल आणि चर्चित संगीतकार अंकित तिवारी ने दिले आहे.
तर, मित्रांनो पिऊन नसणाऱ्या पी. के चा फुल टु धमाल आणि आमिर चा हा नवा अंदाज नक्कीच पाहा. कारण, पी.के इज ऩाॅ़ट वेस्ट आॅफ टाईम.....
gud keep it up dear nice ur review
ReplyDeletethankssssssss
ReplyDelete