Thursday, 25 February 2016

प्रेम.... ज्याला असावी विश्वासाची जोड

                  प्रेम.... ज्याला असावी विश्वासाची जोड
प्रेम......नाव जरी ऐकले तरी मनामध्ये असंख्य विचारांचा गोंधळ होतो. नक्की प्रेम म्हणजे काय? आपण जुन्या प्रेमयुगल्यांच्या अनेक अमर प्रेमकहाण्या वाचतो, ऐकतो. यातुन प्रेम कसे होते याचा अंदाज येतो. एवढेच काय तर आजकाल चित्रपटाच्या माध्यमातुन प्रेमाचा अविष्कार हा घडतच असतो. हातांची पाच बोट जशी सारखी नसतात अगदी त्याचप्रमाणे प्रेमाबद्दल सर्वांचे मत सारखे असते असे नाही. प्रत्येक माणुस या विषयातुन चांगला आणि वाईट अनुभव हा घेतच असतो..प्रेमा बद्दल सकारात्मक आणि नकारात्मक विचार हा मनामध्ये घर करुन बसलेलाच असतो.खरं तर प्रेम हे वा-यासारखे असते ज्याला आपण स्पर्श नाही करु शकत पण त्याला अनभवु शकतो. प्रेमाची अशी एक व्याख्या देखील नाही जे आपल्याला शब्दाने व्यक्त करता येईल..ते तर अबोल आणि निस्तेज असते ज्याच्या सहवासाखाली आज अनेक प्रेमयुगल आपले स्वप्न रंगवत आहे.. प्रेम केल्याने माणुस भरकटतो असे अनेक जणांचा समज असतो पण तेच प्रेम जर तुम्हाला तुमची खरी दिशा दाखवायचा प्रयत्न करत असेल तर ते प्रेम निस्वार्य़ असते.प्रेमाच्या व्याख्या या माणसानेच बनवल्या आहेत त्यामुळे ते प्रेम कसे टिकवायचे हे देखील त्याच्यावरच अवलंबुन असते.
    प्रेम हा असा सहवास आहे जो प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी अनुभवायला मिळतो पण कधीकधी आपणच चुकीच्या नात्याला प्रेम समजतो आणि त्या नात्याचा शेवट होतो. आपण आपल्या आजुबाजुला असे अनेक जोडपे बघतो ज्यांचा प्रेमभंगझालेला असतो.तो-ती आपल्यावर विश्वास ठेवत नाही,मुळात खोटेच प्रेम होते ते.. असे अनेक कारणे देखील ऐकतो. पण, मित्रांनो जगात कोणतीही गोष्ट तेव्हाच गृहित धरली जाते जेव्हा ती आपल्यापासुन किंवा जगापासुन वेगळी असते आणि प्रेम हे त्यातीलच एक अमुल्य गोष्ट आहे. प्रेमभंग झाल्याने मनामध्ये प्रेमाबद्दल नकारात्मक गोष्टी येणे हे स्वाभाविक असतं. जोपर्यंत नातं असतं तोपर्यंत प्रेमाला किंमत असते आणि तेच नातं जेव्हा संपुष्टात येतं तेव्हा मात्र त्याची अव्हेलना करायला मात्र सर्वेच पुढे..प्रेम हा असा सहवास असतो ज्याला आपण आपल्या नात्यात सतत जीवंत ठेवला पाहिजे आणि ते टिकवण्यासाठी त्याला विश्वासाची जोड असणे गरजेची असते तशीच जशी जीवन जगायला श्वासाची... मृत्युच्या दारावर असताना आपण जीव वाचवण्यासाठी जसा अटापिटा करतो हात पाय हलवतो तोच प्रयत्न आपण आपण आपले दुरावलेले प्रेम मिळवण्यासाठी मात्र करत नाही आणि मग प्रयत्न न करता हरवलेल्या नात्यालाब्रेकअप हे नाव देऊन त्या नात्याचा अंत करतो.
      प्रेमामध्ये विश्वास आपुलकी, आदर, समजुतपणा, त्याग करण्याची भावना असेल तर ते प्रेम कायम अतुट राहत. प्रेम करायला एवढी हिंमत लागत नाही जेवढी ते टिकवायला विश्वास लागतो. तुम्ही जर खरंच कुणावर प्रेम करत असाल तर तुमच्य़ा प्रेमाचा सहवास नक्कीच तुमच्या जोडीदाराला होईल.. ते खरे असेल ना तर त्यांच्या प्रेमाची छाप नक्कीच त्यांच्या हृदयात पाडेल. प्रेमाला फक्त प्रेमानेच जिंकता येते. ख-या प्रेमाला त्याची आठवण ही पुरेशी असते. आज भलेही हे प्रेम हरवुन बसले आहे मात्र ते कमी होणार नाही.
प्रेम जगायला शिकवतं, हसायला शिकवतं, यातना सहन करायलाही शिकवंत. आपल्या प्रेमाला तसेच स्विकारा जसे ते आहे तेव्हाच त्यामध्ये खरापणा जाणवेल.. प्रेम हा हृदयातुन येणारा अनुभव असतो आणि जेव्हा ते जाणवेल तेव्हा प्रेमाचा अर्य़ तुम्हाला नक्कीच उमगेल,
So friends always be in LOVE

Tuesday, 14 April 2015

कंगणाचा डबल अंदाज 'तनु वेड्स मनु रिटर्न' चा ट्रेलर आऊट

'तनु वेड्स मनु 'च्या यशानंतर आता बहुचर्चित सिनेमा तनु वेड्स मनु रिटर्न याचा ट्रेलर नुकताच रिलिज झालाय. प्रोेमो मध्ये तनु म्हणजेच कंगना राणावतचे दुहेरी अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हा सिनेमा येत्या 22 मे ला आपल्या भेटीस येतोय.

Wednesday, 18 March 2015

अपघातात घडलेल्या प्रेमाचा 'अगं बाई अरेच्चा 2'

खुप दिवसापांसुन चर्चित असलेला केदार शिंदे यांचा 'अगं बाई अरेच्छा 2' याची उत्सुकता आता लवकरच संपणार आहे. सोनाली कुलकर्णी ची मुख्य भुमिका असलेल्या या सिनेमात भरत जाधव आणि प्रसाद ओक ची देखील महत्वपुर्ण भुमिका आहे.  नुकताच  या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला असुुन 22 मे ला आपल्या भेटीस येणार आहे.

Saturday, 14 March 2015

अपुऱे राहिलेल्या प्रेमाची नव्याने सुरुवात लवकरच.....

टाईमपास 2 चा ट्रेलर आऊट.........

'टु बी कंटिन्यु' म्हणत ज्या 'टाईमपास' चित्रपटाने प्रेक्षकाच्या मनात दगडु- प्राजक्ता च्या अपुर्ण राहिलेल्या प्रेमाबद्दल  हुरहुर निर्माण केली होती,, त्यालाच पुर्ण कऱण्यासाठी म्हणजेच प्राजु आणि दगडु च्या प्रेमाचा गोड शेवट करण्य़ासाठी टाईमपास दिग्दर्शक रवी जाधव आता लवकरच टाईमपास 2  1 मे ला आपल्या भेटीला  आणत आहे. त्याचबरोबर आपले मोठे नवे प्राजु-दगडु कोण असणार यावरुनही  पडदा उठला असुन प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट हे आपल्याला त्य़ांची जागा घेताना दिसणार आहेत. आता, प्रेक्षकांनी जेवढे प्रेम छोट्या लव्हबर्ड्सला दिले आहे तेवढेच या नव्या जोडीला मिळेल का ? हे पाहण्यात मजा येईल ते 1 मे लाच............


Tuesday, 24 February 2015

बदलापुर: वरुण चा थरारक अंदाज


दिग्दर्शक : श्रीराम राघवन
निर्माता : दिनेश विजन, सिनील लुल्ला
कलाकार : वरुण धवन, यामी गौतमी, हिमा कुरेशी, नवाजुद्दीन सिद्धिकी

'डोट मिस द बिगिनिंग'  ही खेचक टॅगलाईन प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यासाठी पुरेशी असताना त्यात चाॅकलेट बॉय वरुणची थरारक सिरिअस टाईप भुमिका चित्रपटाला अजुन रंगवुन देते.  एक हसिना थी.जॉनी गद्दा सारखे चित्रपट केल्यानंतर आता दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी पहिल्यांदा असा थ्रिलर चित्रपट काढलाय. साधारण पणे चित्रपटाच्या नाव आणि प्रोमोवरुण या मध्ये बदला प्रकरण आहे याचा प्रत्यय येतोच.
         रघु (वरुण धवन) आणि त्याची पत्नि निशा ( यामी गौतम) त्यांचा मुलगा हे तिघांचे मिळुन सुखी कुटुंब असते. एका बॅंकेमध्ये दरोडा घातलेल्या चोरांकडुन निशा आणि तिच्या मुलाचा खुन होतो. आपल्या कुटुंबाला आपल्या डोळ्यासमोर डोळे बंद करताना पाहुन रघु मारेकऱ्यांचा शोध घेतो. दरम्यान पोलिस लायक (नवाजुद्दीन सिद्धिकी) ला  पोलिस पकडतात. जेव्हा लायक जेलमधुन सुटतो तेव्हा तो त्याचा शोध घेतो.  तर तो त्यासाठी काय प्रयत्न करतो, तो बदला घेण्यात यशस्वी होतो का ? त्याला त्य़ा दरम्यान कोणकोणत्या आव्हानांना सोमोरे जावे लागते हेच सगळे या सिनेमामध्ये दिग्दर्शकाने मांडले आहे.
      वरुण ने त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासुन लव्हरबाॅय, रोमांटिक भुमिका केल्या आहेत त्याचा सिरिअस, इंटेंस अभिनय त्याने पुरेपुर निभावलाय. लव्हरबाॅय सोबतच अनेक प्रकारच्या भुमिका करण्यात तो सक्षम आहे हे त्याने सिद्द केलेय. त्याचबरोबर, नवाजुद्दीन ने देखील खलनायकाची भुमिका साॅलेड केलीय. तर, हुमा कुरेशी हिने वैश्या ची भुमिका कॅरक्टरला सुट होईल अशी केली आहे. मराठी मधील अभिनेत्री राधिका आपटे हिची ही छोटी भुमिका चांगली होती.
    चित्रपटातील संगीत जी करदा, जीना जीना गाणे हे आजही तेवढेच हिट चालु आहे.सिनेमा ला सचिन जीगर यांनी संगीत दिले आहे.
     थोडक्यात, तुम्हाला जर वरुण चा हा नवा थरारक, अग्रेसिव साईड पाहायची असेल तर सिनेमा जरुर पाहा.

   






Monday, 16 February 2015

प्रेमा ची परिभाषा म्हणजे 'मितवा'


दिग्दर्शिका : स्वप्ना वाघमारे जोशी
निर्माता :  मिनाक्षी सागर, अम़ृत सागर,आकाश चोप्रा, शेखर ज्योती.
कलाकार : स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे.

मितवा - मित्र तत्वज्ञ वा़टाड्या स्वप्नील जोशीच्या या मितवा मधील शब्दांनी अख्या महाराष्ट्रातील तरुणाईला वेडावुन सोडले होते ,तो 'मितवा' नुकताच प्रदर्शित झालाय. मुळात प्रेम हा सर्व चित्रपटांमध्ये कॉमन शब्द असतो पण,कथेेत त्याची मांडणी दिग्दर्शक कशा प्रकारे करतो हि त्यांची परिक्षा असते आणि त्यात दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांनी स्वत ला चांगलेच सिद्द केलंय. चित्रपटाचे प्रोेमोज पाहताना याचा प्रत्यय येतोच की, यात प्रेमाचा त्रिकोण आहे, हे साहजिक आपल्याला प्रत्येक चित्रपटांमध्ये पाहायला मिळते पण, यामध्ये ही काहीसे वेगळेपण आहे , प्रेमात असतानाचा आनंद, कालांतराने ते दुरावल्याने होणारे दुख, ड्रामा,ट्रेजडी,रुसवा या सर्वांचे मिश्रण करुन बनवण्यात आलेला हा करण जोहर टाईप सिनेमा प्रत्येकाला काहीना काही प्रेमाचे धडे देऊन जाणारा आहे एवढे मात्र नक्की..आपण ज्यांच्यांवर प्रेम करतो तो सतत आपल्याजवळ असण्यापेक्षा त्याचा काही काळापुरता सहवास हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, असेच काहीसे सांगण्याचा प्रयत्न स्वप्ना वाघमारे यांनी सांगितलाय. त्याचे प्रेम जरी आपल्या सोबत नसेल तर त्याची बांधिलकी आपल्याकडे असते.

  तिचं कर्तव्य तिथे असले ना... तरी तिचं प्रेम इथे आहे.
  तिची बांधिलकी तिथे असली....तरी तिचामितवा इथे आहे

     
हिंदी सृष्टीतील छोट्या पडद्यावर यशस्वी काम करणारी दिग्दर्शिका स्वप्ना जोशी वाघमारे यांनी पहिल्यांदाच मितवा या रोमांटिक चित्रपटातुन मराठी सिनेस़ृष्टीत दिग्दर्शिका म्हणुन पाऊल टाकले आहे. तरुणाईचा इंट्रेस लक्षात घेऊन आजच्या पिढीला काय आवडेल, आणि त्याचबरोबर प्रेमातुन ही काहीसे धडे मिळतील याचा एकत्रित विचार करुन सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 
      (स्वप्निल जोशी )शिवम सारंग दिलफेक, अय्याश पण एका आलिशान रेसोर्ट चा मालक ज्याला प्रेम, लग्न, कमेटमेंट या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. तर दुसरीकडे अवनी (प्रार्थना बेहरे)  त्याची सहकारी आणि मैत्रीण ही.. ज्यांचे नाते हे मैत्रीच्या थोडे पलिकडे तर प्रेंमाच्या थोडे अलिकडचे. अवनी जिचे शिवम वर प्रेम असते. आता या दोघांच्या मैत्रीमध्ये एन्ट्री होते ती नंदनी ची (सोनाली कुलकर्णी) ची जी शिवम च्या ऑफिस मध्ये नोकरीकरिता  आली असते अत्यंत साधी, सरळ.. सोनाली चे शिवम कडे डुंकुन ही न पाहणे,त्याला अस्वस्थ करते नकळत तो ति्च्याकडे् ओढला जातो तिच्यावर प्रेम करु लागतो शेवटी त्याच्या ही प्रेमाची छाप साेनाली वर पडतेच पण, एक गोष्ट असते जी तिला त्याच्याकडे जाण्यास मज्जाव करत असते आणि त्याचा उलगडा होतो तो फ्लॅशबॅक मध्ये,.....भुतकाळातील घटनेमुळे तिचे पाय शिवम कडे सरसावत नसतात...आणि ते नक्की काय आहे हाच आहे 'मितवा' चा सस्पेन्स...
      स्वप्निल जोशी ने शिवम हा कॅरेक्टर चांगलाच जमावलाय. त्याच्या या प्लेबॉय ईमेज त्याची फिमेल फॉलोविंग मध्ये अजुन वाढ होईल हे मात्र नक्की.  तर,  लक्स झक्कास हिरोईम मधुन विजेती बनलेली अभिनेत्री प्रार्थना बहिरे ने ही स्वत ला चांगलेच सिद्ध केलंय.. क्लासमेट्स नंतर अत्यंत वेगळ्या रुपात येऊन आपली साधी छाप पाडण्यात सोनाली कुलकर्णी ही यशस्वी ठरली. तर, संग्राम साळवी, इला भाटे, करुणा ईराणी यांच्य़ा छोट्या भुमिका ही अप्रतिम होत्या.
       त्याचबरोबर चित्रपटातील गाण्यांकरिता निवडण्यात आलेले लोकेशन्स देखील अप्रतिम आणि त्यामुळे  गाणी पाहण्यास आतुरता वाटते. त्याला सुरेख जोड मिळाली ती, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार शंकर, एहसान, लॉय, आणि निलेश मोहरीर, अमित राज,पंकज पाडघाण, यांच्या संगीताच्या स्पर्शाने चित्रपटाच्या गाण्यांना चाॅंद चाॅंद लावलं. मोजुन फक्त 5 गाणी असलेल्या या चित्रपटात गाण्यांची माडंणी कुठे आणि कशी करायची याची चांगलीच दखल दिग्दर्शक ने घेतली आहे. सावर रे, मितवा, सत्यम शिवम सुंदरम, हे गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठांवर नाचत आहे.
थोडक्यात काय तर, प्रेमाच्या दिवसात आपल्या जोडीदारासोबत अर्थात आपल्या मितवा सोबत प्रेमाची परिभाषा जाणुन घ्यायला मितवा पाहायलाच हवा
   
      

Sunday, 8 February 2015

चेहरा आणि आवाज यांचा अचुक मेळ म्हणजे 'शमिताभ'


दिग्दर्शन : आर. बाल्की
निर्माता : सुनिल लुल्ला, आर. बाल्की,राकेश झुंझुनवाला.
कलाकार : अमिताभ बच्चन, धनुष, अक्षरा हसन


अगळा वेगळा अंदाज आणि हटके भुमिका करण्याचा अमिताभ बच्चन चा फॉमुला  नेहमीच काम करतो. चिनी कम आणि पा सारखे हटके सिनेमा दिणारे दिग्दर्शक आर. बाल्की हे पुन्हा नवीन थिम घेऊन आपल्या समोर आलेत.

दानिश (धनुष) ज्याला अभिनय आणि चित्रपटांचा फार क्रेझ असतो, त्याची हिच आवड त्याला मुंबईला घेऊन येते. तेथे त्याची ओळख होते असिस्टंट डायरेक्टर अक्षरा सोबत. आणि मग, तिच्या सहाय्याने दानिश आपले स्वप्न पुर्ण करु पाहतो. तर दुसरीकडे अमिताभ सिन्हा (अमिताभ बच्चन) ज्यांना एक्टर बनायचे असते,,रोजचा स्ट्रगल आणि संघर्ष त्यांना दारुच्या आहारी घेऊन जातो. दानिष हा मुका असल्याने त्याला कुठेही काम मिळत नसते मग तेव्हा अमिताभ चा आवाज आणि दानिष चा बेतोड अभिनय म्हणजे 'शमिताभ' चा झक्कास केमेस्ट्री येथे प्रेक्षकांना पहायला मिळणार.

           चिनी कम, पा सारखे चित्रपट केल्यानंतर नवीन प्रयोग आर. बाल्की  यांनी केलाय.आवाज एकाचा आणि अभिनय एकाचा याची एकत्र ट्युनिंग अगदी अचुकपणे मिळवुन आणणे सोपे नाही पण त्यांनी हे चांगलेच जमवुण आणले आहे.
      अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन यांनीस्टगलिंग एक्टर आणि दारुडा व्यक्तिचा अभिनय मस्तच केलाय  त्याचबरोबर  त्याला तडका मिळालाय तो त्यांचा विनोदी पणाचा. आणि अमिताभ यांच्या आवाजाचा पिदली सी बाते हे त्यांच्या आवाजातले गाणे सध्या चर्चित झालेय.  म्हणजे सोने पे सुहागा. तर, धनुष ने देखील त्याच्या अभिनयाला पुरता न्याय दिलाय. अक्षरा हसन चा पहिलाच सिमेमा असुन तिच्या वाटेला आलेला रोल तिने चांगलाच सांभाळलाय.

थोडक्यात, वेगळी आणि मनोरंजनात्मक कथा आणि अमिताभ बच्चन आणि धनुष चा उत्कृष्ट अभिनय, केमेस्ट्री तुमचे मनोरंजन करेलच.