Thursday, 25 February 2016

प्रेम.... ज्याला असावी विश्वासाची जोड

                  प्रेम.... ज्याला असावी विश्वासाची जोड
प्रेम......नाव जरी ऐकले तरी मनामध्ये असंख्य विचारांचा गोंधळ होतो. नक्की प्रेम म्हणजे काय? आपण जुन्या प्रेमयुगल्यांच्या अनेक अमर प्रेमकहाण्या वाचतो, ऐकतो. यातुन प्रेम कसे होते याचा अंदाज येतो. एवढेच काय तर आजकाल चित्रपटाच्या माध्यमातुन प्रेमाचा अविष्कार हा घडतच असतो. हातांची पाच बोट जशी सारखी नसतात अगदी त्याचप्रमाणे प्रेमाबद्दल सर्वांचे मत सारखे असते असे नाही. प्रत्येक माणुस या विषयातुन चांगला आणि वाईट अनुभव हा घेतच असतो..प्रेमा बद्दल सकारात्मक आणि नकारात्मक विचार हा मनामध्ये घर करुन बसलेलाच असतो.खरं तर प्रेम हे वा-यासारखे असते ज्याला आपण स्पर्श नाही करु शकत पण त्याला अनभवु शकतो. प्रेमाची अशी एक व्याख्या देखील नाही जे आपल्याला शब्दाने व्यक्त करता येईल..ते तर अबोल आणि निस्तेज असते ज्याच्या सहवासाखाली आज अनेक प्रेमयुगल आपले स्वप्न रंगवत आहे.. प्रेम केल्याने माणुस भरकटतो असे अनेक जणांचा समज असतो पण तेच प्रेम जर तुम्हाला तुमची खरी दिशा दाखवायचा प्रयत्न करत असेल तर ते प्रेम निस्वार्य़ असते.प्रेमाच्या व्याख्या या माणसानेच बनवल्या आहेत त्यामुळे ते प्रेम कसे टिकवायचे हे देखील त्याच्यावरच अवलंबुन असते.
    प्रेम हा असा सहवास आहे जो प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी अनुभवायला मिळतो पण कधीकधी आपणच चुकीच्या नात्याला प्रेम समजतो आणि त्या नात्याचा शेवट होतो. आपण आपल्या आजुबाजुला असे अनेक जोडपे बघतो ज्यांचा प्रेमभंगझालेला असतो.तो-ती आपल्यावर विश्वास ठेवत नाही,मुळात खोटेच प्रेम होते ते.. असे अनेक कारणे देखील ऐकतो. पण, मित्रांनो जगात कोणतीही गोष्ट तेव्हाच गृहित धरली जाते जेव्हा ती आपल्यापासुन किंवा जगापासुन वेगळी असते आणि प्रेम हे त्यातीलच एक अमुल्य गोष्ट आहे. प्रेमभंग झाल्याने मनामध्ये प्रेमाबद्दल नकारात्मक गोष्टी येणे हे स्वाभाविक असतं. जोपर्यंत नातं असतं तोपर्यंत प्रेमाला किंमत असते आणि तेच नातं जेव्हा संपुष्टात येतं तेव्हा मात्र त्याची अव्हेलना करायला मात्र सर्वेच पुढे..प्रेम हा असा सहवास असतो ज्याला आपण आपल्या नात्यात सतत जीवंत ठेवला पाहिजे आणि ते टिकवण्यासाठी त्याला विश्वासाची जोड असणे गरजेची असते तशीच जशी जीवन जगायला श्वासाची... मृत्युच्या दारावर असताना आपण जीव वाचवण्यासाठी जसा अटापिटा करतो हात पाय हलवतो तोच प्रयत्न आपण आपण आपले दुरावलेले प्रेम मिळवण्यासाठी मात्र करत नाही आणि मग प्रयत्न न करता हरवलेल्या नात्यालाब्रेकअप हे नाव देऊन त्या नात्याचा अंत करतो.
      प्रेमामध्ये विश्वास आपुलकी, आदर, समजुतपणा, त्याग करण्याची भावना असेल तर ते प्रेम कायम अतुट राहत. प्रेम करायला एवढी हिंमत लागत नाही जेवढी ते टिकवायला विश्वास लागतो. तुम्ही जर खरंच कुणावर प्रेम करत असाल तर तुमच्य़ा प्रेमाचा सहवास नक्कीच तुमच्या जोडीदाराला होईल.. ते खरे असेल ना तर त्यांच्या प्रेमाची छाप नक्कीच त्यांच्या हृदयात पाडेल. प्रेमाला फक्त प्रेमानेच जिंकता येते. ख-या प्रेमाला त्याची आठवण ही पुरेशी असते. आज भलेही हे प्रेम हरवुन बसले आहे मात्र ते कमी होणार नाही.
प्रेम जगायला शिकवतं, हसायला शिकवतं, यातना सहन करायलाही शिकवंत. आपल्या प्रेमाला तसेच स्विकारा जसे ते आहे तेव्हाच त्यामध्ये खरापणा जाणवेल.. प्रेम हा हृदयातुन येणारा अनुभव असतो आणि जेव्हा ते जाणवेल तेव्हा प्रेमाचा अर्य़ तुम्हाला नक्कीच उमगेल,
So friends always be in LOVE